जळगाव महावितरणमध्ये युनिट घोटाळा?

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होता. त्यामुळे प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतले गेले नसल्याने, सरासरी वीज बिलाची आकारणी केली गेली. मात्र आता लॉकडाऊन व अनलॉक होताच वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. सरासरी बिल दिल्यानंतर जून महिन्यात अक्षरशः बिलाची चौपट आकारणी केली गेली असल्याचे स्पष्ट झाल्याने महावितरणमध्ये सुरु असलेला युनिट घोटाळा समोर आला आहे. याबाबत जळगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
व्यापार, उद्योग बंद आहेत. नागरिकांचे खिसे रिकामे झाले आहे. आर्थिक समस्या असल्याने फक्त मासिक भाडे आकारण्यात यावे, असे आदेश असताना, वाढीव बिल दिल्याबद्दल काल (दि.६) दुपारी २ वाजता महावितरण विभागीय कार्यालयात गिरणा पंपिंग सबस्टेशन जळगाव येथे वाढीव वीज बिल संदर्भात निवेदन युनिटहेड जयंत लढे यांना देण्यात आले व त्यांच्याशी चर्चा करून यात मार्ग काढण्यात यावा. तसेच नागरिकांना होणाऱा त्रास सरकारपर्यंत पोहचवावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजित राणे, मंडळ सरचिटणीस अक्षय चौधरी, मंडळ चिटणीस दीपक पाटील, बंटी नेरपगारे, मंडळ प्रसिध्दीप्रमुख अमित शिंदे, भाजयुमोर्चा जिल्हा महानगरचे कोषाध्यक्ष ऋषिकेश पाटील, भाजयूमोर्चाचे जयेश विसपुते यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here