जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील)- सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असून, आज (दि.२१) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ५९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत तर ३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आज आढळलेल्या ५९ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर –२७, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ- ११, अमळनेर- ०३, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०४, एरंडोल-००, जामनेर-०३,रावेर-०३, पारोळा-०४, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०१ असा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५४ हजार ०४८ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ३६३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुदैवाने आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र आतापर्यंत १२८६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. तर ३९७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.







