गांजाचे सेवन करत असल्याची कबुली कॉमेडियन भारती सिंहची कबुली; पोलिसांनी केली अटक

bharati-sing

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी आणि कार्यालयावर एनसीबीने छापेमारी केली होती. या छाप्यात ८६.५ ग्रँम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दिली. यामुळे भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तर तिच्या पतीची चौकशी केली जात असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

 

दरम्यान अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात एनसीबीने छापेमारी केली होती. त्यानंतर भारती सिंहला अटक करण्यात आली आहे.सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरणाचा तपास बऱ्याच काळापासून सुरू आहे. आता या प्रकरणात कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्षवर्धन लिंबाचिया यांचं नाव समोर आलं. एएनआयने सकाळी ट्वीट करत यासंबंधीची माहिती दिली. या ट्वीटमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं की, ‘मुंबईत कॉमेडियन भारती सिंगच्या घरी नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने छापा टाकला आहे.’bharati-sing-arrested

 

एनसीबीची टीम भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या मुंबईच्या घरी चौकशीसाठी पोहोचली.बॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या तपासात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. यात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग, अर्जुन रामपालची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांसारख्याची नावं समोर आली आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here