भादवणमध्ये भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

bhadvan-bjp-office

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मौजे भादवण, ता.आजरा येथे भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे ऊद्घाटन भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भादवण गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री .टी.बी.मुळीक होते.

 

यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांनी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी राजे समरजीतसिंह घाटगे यांचा श्री .संजय मुळीक यांनी शाल श्रीफळ व हार देवून सत्कार केला. तसेच श्री.शैलेंद्र मुळीक यांना तालुका उपाध्यक्ष मिळालेबद्दल व सौ. पूजा हाळवणकरा यांना महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष पद मिळालेबद्दल राजे समरजीतसिंह घाटगेंच्या हस्ते सत्कार करणेत आला.

 

याप्रसंगी आजरा तालुका अध्यक्ष श्री .सुधीर कुंभार, तालुका सरचिटणीस श्री .आतिषकुमार देसाई, युवा मोर्चा अध्यक्ष श्री .संतोष बेलवाडे इ. पदाधिकारी उपस्थित होते. भादवण मधील नव नियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे व सत्कार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी श्री ,सुधीर कुंभार, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ,टी.बी.मुळीक व सौ. वर्षा तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास श्री .अमोल हाळवणकर, मारुती गाडे, महादेव भादवणकर, मिलींद केसरकर. मारुती देसाई, यल्लाप्पा शिवगंड, गोविंद पाटील, सखाराम डोंगरे, राणबा कुंभार, शिवाजी आजगेकर, आनंदा संकपाळ, प्रकाश परीट, दिपक गोडसे, सौ.उमा शिंदे, दीपा खुळे, रोहीणी मुळीक, शितल डोंगरे, नंदा आजगेकर, सुनंदा कुंभार, निलम देवरकर, सुनंदा शिंदे, मेघा तुरंबेकर, सविता देवरकर, सुनंदा उंडगे, सिध्दय्या जंगम, संभाजी हाळवणकर, यशवंत बारदेस्कर, जोतीबा आजगेकर, सुमित कुंभार, निरंजन देवरकर, पांडूरंग उंडगे, आनिकेत मुळीक, राघवेंद्र डोंगरे, सुशिल डोंगरे, संदीप सुतार तसेच भादवन व पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भादवण शाखा अध्यक्ष श्री .हरीश देवरकर यांनी केले. सुत्रसंचालन श्री .विशाल आजगेकर व आभार शाखा उपाध्यक्ष श्री .बाळासाहेब पाटील यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here