जिल्ह्यातील दोन शिक्षकांसह दोन शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित

corona-test-positive

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) – सोमवार 23 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू कारण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हयातील 18 हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

 

दरम्यान धक्कादायक प्रकार म्हणजे या कोरोना तपासणीत दोन शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

या कोरोनाबाधितांमध्ये भुसावळ तालुक्यातील एक शिक्षक, दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तर जळगाव तालुक्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सर्व महाविद्यालयांनी आपल्या शिक्षकांना सोमवारपासून नियमित तासिका सुरु होणार असून, सकाळी ११ वाजता शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने पालकांची चिंता वाढली असून, पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here