नागपूर जिल्ह्यात 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

teacher-corona-test

मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील शाळा सोमवारपासून सुरु होणार नाहीत. नागपूर जिल्ह्यातही 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. तसा आदेश महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी दिला आहे.

 

नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासजी शाळा बंद राहणार आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास बहुसंख्य पालकांचा विरोध आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. त्यानुसार राज्यभरात शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरु आहेत. त्यात अनेक शिक्षक पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात येत आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याचं चित्र समोर आलं होतं. पण आता कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. राज्यात काल 5760 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4088 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1,64,7004 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here