खुलताबाद तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांना बजावली नोटीस

pradhanmantri-kisan-sanman-yojana

320 शेतकऱ्यांवर होणार कार्यवाही

खुलताबाद (बाजार सावंगी प्रतिनिधी मूनीर शाह) – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लाटणाऱ्या 323 बोगस लाभार्थी यांना नोटीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमात न बसणारे. 320 शेतकऱ्यांना तहसील कार्यालय खुलताबाद यांनी नोटीस बजावली आहे.

 

सदरील शेतकरी हे शासकीय नोकरदार इन्कम टॅक्स पेंशनधारक.आहेत नोटीसमध्ये नमूद प्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमात न बसणारे शासनाला खोटी माहिती सादर करून या योजनेचा लाभ मिळवून घेतला आहेत सदरील योजनेच्या माध्यमातून इतके पैसे मिळवून घेतले आहेत ते पैसे लवकरात लवकर नगद किंवा चेकच्या स्वरुपात तहसील कार्यालयात जमा करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे म्हणाले.

 

आधार कार्ड लिंक असल्यामुळे सदर योजनेच्या पात्र – अपात्र लाभार्थी यांचा सर्व बायोडाटा आधार क्रमांक वरून शासनासमोर आला आहे सदरील योजनेच्या कोण पात्र आणि अपात्र यादी मध्ये खुलताबाद तालुक्यातील 320 शेतकरी समोर आले आहे तर अजूनही यादी दीपावली.मुळे पूर्ण झालेल्या नाहीत त्वरित बोगस लाभार्थी लवकरच शासनाच्या समोर येणार आहे. या कार्यवाहीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here