सेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून उस तोड कामगाराची दिवाळी साजरी

पुणे (प्रतिनिधी सुनील भोसले) – भादलवाडी येथे उसतोड कामगाराची दिवाळी सेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कु.नेहाजी नामदेव भोसले हिचा वाढदिवसनिमित्त मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी शुभेछा देताना अखिल भारतीय सेना इंदापूर तालुका अध्यक्ष सुंदर कुसाळकर उपस्थित होते. आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले हे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यामुळे खरे कष्टकरी गरीब लोकांपर्यंत पोचुन त्यांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. आज त्यांच्या या उपक्रमामुळे हजारो गरीब कुटुंबांना दिवाळीचा आनंद मिळाला आहे. जर प्रत्येकाने नामदेव भोसले यांच्यासारखे वाढदिवसाचे उपक्रम राबवले तर समाजहिताचा संदेश लोकांपर्यंत पोहचेल.

 

 

यावेळी नेहाजी नामदेव भोसले,यांना पोलीस उपनिरीक्षक विरेष प्रभू, पुणे जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा .अभिनव देशमुख. व नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,पालकमंत्री अजितदादा पवार यांचे पि .ये .तहसीलदार हनुमंत पाटील, आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे ,पोलीस उपअधीक्षक बारामती,नारायण शिरगावकर, पोलीस .नि.जिवन माणे व पो.नि.दिलीप पवार यां नी कु नेहाजी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव भोसले व सुंदर कुसाळकर.पिंटू शिंदे.संतोष भोसले. शर्मा पवार. स्वप्रित भोसले,सचिन राऊत, गौरी भोसले, परेवा काळे, राणी भोसले,व इतर उसतोड मजुर मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here