आटपाडी (सांगली) (प्रतिनिधी) – लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात आटपाडी तालुक्यातल्या १०१ कार्यकर्त्यांच्या दारात १०१ पिंपळाची रोपे लावण्याचा संकल्पाचा एक भाग म्हणून युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख , युवक राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतजी वर्पे आणि सांगली जिल्हा युवक अध्यक्ष भरत देशमुख यांचे हस्ते विठलापूरात कार्यकर्त्याच्या दारात पिंपळाच्या रोपाचे रोपण करण्यात आले .
आयूर्वेदात, धार्मिक कार्यात आणि मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व असणाऱ्या दैवी शक्तीचा अंश लाभलेल्या पिंपळाच्या वृक्षारोपणातून मानवी जीवनाला सुसह्य बनविण्याच्या भावनेतून आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या सह त्यांचा परिवार राज्यातल्या लाखोंच्या जीवनात बहुगुणी पिंपळासारखे नव चैतन्य आणण्यात यशस्वी झाला . आदरणीय राजारामबापुंच्या जन्म शताब्दी वर्ष पूर्ती च्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिनव पद्धतीने अभिवादन करणे , त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुक्याचे माजी अध्यक्ष अमित ऐवळे यांनी हा संकल्प सोडला होता . महाराष्ट्राचे युवक नेते प्रतिकदादा जयंतराव पाटील यांच्या हस्ते गोमेवाडी येथे कार्यकर्त्याच्या दारात पिंपळाच्या रोपाचे वृक्षारोपण करून या संकल्पाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात करण्यात आला होता .
आज सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी आटपाडीत या मान्यवरांना थांबवून त्यांचा यथोचित सन्मान केला . आटपाडी तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष अमित ऐवळे यांनी महिबूब शेख,रविकांत वर्पे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले . राष्ट्रवादीचे विद्यमान युवक तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांनी ही उभय मान्यवरांचे स्वागत केले . आटपाडीत यावेळी युवक नेते अजमुद्दीन उर्फ मनू इनामदार, युवक नेते नितीनराव डांगे, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष आटपाडी तालुक्याचे युवक नेते किशोरजी गायकवाड, तर विठलापूर येथे विठलापूर सोसायटीचे माजी चेअरमन मारूती बाड,भानुदास कांबळे,दिपक जावीर, हणमंत केंगार, काशिनाथ जावीर,निखिल कांबळे,रामकृष्ण शिंदे, सिद्धनाथ जावीर इत्पादी अनेक मान्यवर उपस्थित होते .







