बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आठ महीन्यापासून बंद असलेली मंदिरे राज्य शासनाने १६नोव्हेंबर २०२०पासून काही अटींचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत .
अनेक दिवसापासून आईंचे दर्शनाची आस लागलेली असल्याने दररोज वाढत्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनास येत आहेत. कोरोनाची दुसरी लाट अनेक राज्यात दिसुन आली .येत्या कार्तिक एकादशी वारीस हजारो भाविक संत मुक्ताबाई दर्शनाला आल्यास कोरोना संक्रमणाचा फैलाव अधिक वेगाने वाढण्याची शक्यता जास्त आहे. शासनास सहकार्य , सामाजीक जबाबदारी म्हणून व मंदिरात एकाच दिवशी गर्दी होवू नये याकरिता श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर विश्वस्त मंडळाने येत्या कार्तिक शुध्द एकादशी गुरुवार दि.२६ / ११ / २०२० रोजी संत मुक्ताबाई मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे..तरी वारकरी भाविकांनी कार्तिक एकादशीला दर्शनास येवू नये.
ईतर दिवशी मात्र मंदीर उघडे राहील व नियमाप्रमाणे सोशल डीस्टसींग चे पालन करित मास्क घालून भाविकांना मुक्ताबाई दर्शन घेता येईल, असे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील व विश्वस्त मंडळाने कळविले आहे.







