चाळीसगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीमेस सुरुवात

Encroachment-Removal-Campaign

चाळीसगाव (प्रतिनिधी) – नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या आदेशानुसार चाळीसगाव नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटावण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून वाहतुकीस अडथळा ठरणारी तसेच नागरिकांना अडचण ठरत असलेल्या अतिक्रमणे हटावण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 

ncroachment-Removal-Campaign1

 

आज सकाळी ११ वाजता मोहिमेस सुरुवात करण्यात आल्यानंतर शहरातील भडगाव रोड, हिरापूर रोड, धुळे रोड परिसरात रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या धारकांना यापूर्वी नोटीस देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसांत अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण न काढल्यास कडक कारवाई करण्यात येवून अतिक्रमणे हटवली जातील असे अतिक्रमण विभाग प्रमुख प्रेमसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले

 

यावेळी नगर अभियंता विजय पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रेमसिंग राजपूत, लिपिक भूषण लाटे, आरोग्य निरीक्षक संजय गोयर सुमित सोनवणे, तुषार माने, मेहमूद बेग, भगवान आगोणे, वकार शेख, शेख सलिम आदी कर्मचाऱ्यांच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here