मालेगाव तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे यांची निवड
धुळे (प्रतिनिधी संतोष कोळी) – दोंडाईचा येथील बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी रणदिवे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष एस्. एन्. ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्राचे संपर्प्रमुख पत्रकार संतोष कोळी यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष नवनीत बागले यांच्या उपस्थित आज मजदूर संघाचे नेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप विश्राम पाटील यांची उत्तर महाराष्ट्र फादर कमिटीचे संघटकपदी, तर मालेगाव तालुक्यातील सुभाष सोनवणे यांची मालेगाव तालुका अध्यक्षपदी हि निवड करण्यात आली.
पत्रकार ,संतोष कोळी यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार ॲडवोकेट संतोष भोई अशोक भिका तलमले ऊस तोड कामगार संघाचे, नेते यांची उपस्थिती होती. निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष संजय रणदिवे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एन. ठाकूर राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंतजी कळसे महासचिव पंडित कांबळे यांनी भ्रमनध्वनी वरुन कौतुक केले, या प्रसंगी धुळे जिल्हा सरचिटणीस ओंकार पगारे, अभिषेक पाटील उपस्थित होते यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष ,दिनेश बेडसे यांनी कौतुक केले आहे







