नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – औरंगाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक झाली. या बैठकीत औरंगाबाद पूर्व विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदी मुक्ताराम गव्हाणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
या वेळी युवती प्रदेशाध्यक्ष पूजा ताई मोरे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील ,राज्य कार्यकारणी सदस्य कटारे आण्णा , विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे ,चंद्रशेखर साळुंखे, माऊली मुळे , आझम खान, विभागाचे प्रवक्ते प्रा.शिवाजी हुसे या मान्यवरांसोबत तालुका व जिल्हा कार्यकारनीचे सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
मुक्ताराम गव्हाणे यांच्या निवडी बद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानीय राजू शेट्टी साहेब, डॉ.प्रकाश पोपळे सर , रविकांत तुपकर साहेब, प्रा.डॉ जालंदर पाटील सर, रसिका ताई ढगे , अमर दादा कदम , अमोल दादा हिप्परगे , या सह राज्यातील सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.







