२०२० च्या ‘मृदगंध’ पुरस्काराची घोषणा..

vitthal-umap

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – दरवर्षी २६ नोव्हेंबरला दहावे लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती दिनी आणि विठ्ठल उमल फाऊंडेशन तर्फे संगीत समारोह आणि ‘मृदगंध’ पुरस्काराचे भव्य आयोजन केले जाते. या संगीत समारोहामध्ये दिग्गज कलाकारांना सहभागी करण्यात येते. त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे ‘मृदगंध पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. यावर्षी देखील ही मालिका यांनी अशीच सुरू ठेवण्याचे योजिले आहे.

 

कोरोना कोविड – १९ च्या महामारीमुळे सामाजिक भान ठेवून २०२० या वर्षाचा हा पुरस्कार फक्त घोषित करण्यात आलेला आहे. यावर्षीचे पुरस्कार मानकरी आहेत. साहित्य व नाटक क्षेत्राचा हा पुरस्कार प्रेमानंद गजवी यांना जाहीर करण्यात आला आहे. अभिनेता, निर्माता म्हणून हा पुरस्कार प्रशांत दामले यांना देण्यात आलेला आहे. संगीत क्षेत्रात अशोक वायंगणकर यांना तर युथ आयकॉन या क्षेत्रात कु. प्राजक्ता कोळी आणि सामाजिक क्षेत्रात रवींद्र बिरारी यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत.

 

सर्वात महत्वाचा लोककला क्षेत्रातील जीवन गौरव हा पुरस्कार माया जाधव यांना प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराचे वितरण पुढच्या वर्षी पुरस्कारांना सोबत करण्याचे ठरविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here