मुंबई महापालिकेकडून मनेष चव्हाण यांचा सन्मान

Manesh-Chavan-photo

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – येथील मनेष चव्हाण याना कोरोना काळात निर्भीडपणे अहोरात्र रुग्ण सेवा बजावल्याबद्धल मुंबई महापालिकेने सन्मानित केले आहे.

 

मनेष चव्हाण हे मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहेत कोरोना काळात रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा व कुटुंबातील सहचारिणीचा उत्साहवर्धक पाठिंबा असल्याने अहोरात्र काही दिवस घरी न जाता कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात मनिष चव्हाण यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपुलकीने रुग्ण सेवा केली.
त्यांच्य या कार्याची दखल घेत नुकताच मुंबई महापालिकेने सन्मान कार्यक्रमात जेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र देऊन जाहीर गौरव सन्मान करण्यात आला. मुंबई महापालिकेत व ठाणे जिल्ह्यात त्यांच्या अतुलनीय सेवेबद्धल कौतुकाचा वर्षाव व अभिनंदन होत आहे.

 

 

Manesh-Chavan

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here