तुटलेल्या नाल्याचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर दुरुस्त करण्यसाठी विरेंद्र म्हात्रे यांचे आयुक्तांना निवेदन

Broken-drains

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) – माजी नगरसेवक नामदेव रामा भगत यांच्या ऑफिसच्या बाजूला सेक्टर २०,नेरूळ येथील फुटपाथवर नाला हा सद्यस्थितीत तुटलेल्या अवस्थेत आहे.या फुटपाथ वरून रोज नागरिकांची व लहान मुलांची ये-जा असते.चुकून कोणाचा तोल गेल्यास तो नाल्यात पडून गंभीर जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

nivedan

 

तरी लवकरात लवकर सदर नाल्याचे दुरुस्तीचे आदेश संबंधितांना देऊन योग्य ती कारवाई करावी आशा प्रकारचे निवेदन नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर  यांना निवेदन दिले.

 

Broken-drains2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here