पुणे येथील भाजपा मधील माळी समाजाच्या कार्यकर्त्याची मानसिकता मेली का ? – प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन

anil-mahajan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – पदवीधर मतदार संघातील उमेदवार संग्राम पाटील यांच्या प्रचारार्थ पुणे येथील महाबैठकीत विरोधी पक्ष नेते,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मनोगता मध्ये सुरुवातीला महापुरुषांचे नाव घेतांना क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे नाव त्यांनी घेतले नाही.

Maharashtra-Mali-Samaj-Mahasangh

 

पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा उघडून जोतिबा फुले यांनी अनमोल असे कार्य केले आहे.पुणे हा पुरोगामी विचारसरणीचा भाग आहे.महात्मा जोतिबा फुले यांना मानणारा वर्ग तेथे मोठ्या प्रमाणात आहे.माळी समाजासह बहुजन समाजाची संख्या पुणे येथे मोठ्या प्रमाणात आहे.या सर्व लोकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील माळी / ओबीसी बहुजन समाजच्या भावना आपण आज दुखावल्या महात्मा जोतिबा फुले यांचे नाव का ? घेतले नाही आपण संविधानिक महत्वाचे पदावर आहेत.देवेंद्र भाऊ तुह्मी चुकले पुणेमध्ये कार्यक्रम घेतात आणि महात्मा जोतिबा फुले याचे नाव घेत नाहीत यांची आठवण आपल्याला कशी राहिली नाही फुलेंचा एवढा द्वेष का.?

 

आपण माजी मुख्यमंत्री आहात आपल्या कडून सर्व समाजाच्या लोकांच्या अपेक्षा आहेत.महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने आम्ही आपला आजच्या पुणे येथील कार्यक्रमाचा निषेध व्यक्त करतो, असे अनिल महाजन यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here