तरुणीचे मामाच्या गावातून अपहरण करुन १४ दिवस बलात्कार

lady-doctor-mollest

कोटा – राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सलग १४ दिवस बलात्कार केला. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर घटना उघडकीस आली. बुंदी जिल्ह्यातील कापरेन येथील एका २२ वर्षीय तरुणावर पीडितेने आरोप केला आहे.

 

 

आरोपीने कोटा जिल्ह्यातील मंडानाजवळील जंगल परिसरात १४ दिवस डांबून ठेवल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अंता पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तरुणाच्या तावडीतून २२ नोव्हेंबरला माझ्या वडिलांनी सुटका केली. त्यानंतर मी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली, असे तरुणीने पोलिसांना सांगितले. फोरूलाल असे आरोपीचे नाव असून, तो बुंदी जिल्ह्यातील कापरेन येथील रहिवासी आहे. मामाच्या गावातून तरुणाने अपहरण केले. ती एका लग्नसोहळ्यासाठी तिथे गेली होती. गावाजवळील मोकळ्या जागेत नैसर्गिक विधीसाठी गेली असता, तरुणाने जबरदस्ती मोटरसायकलवर बसवून घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला जंगलात नेऊन डांबून ठेवले. तेथे त्याने वारंवार बलात्कार केला.

 

त्याचदरम्यान एक दिवस संधी मिळाल्यानंतर तिने वडिलांशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर वडील आले आणि त्यांनी तरुणीची सुटका केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here