केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्याविरुद्ध कामगार संघटनांचा देशव्यापी संप यशस्वी

कामगार-संघटनां

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – केंद्रातील भाजप सरकारने कामगार कायद्यात बदल करून मालाजधार्जिणे कायदे बनविल्याच्या निषेधार्थ भारतातील दहा केंद्रीय कामगार संघटना व पाचशे शेतकरी संघटनांनी पुकारलेला आजचा देशव्यापी संप यशस्वी झाला.या संपात इंटक, आयटक,एच एम एस, सिटू, भारतीय कामगार सेना , व इतर कामगार संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांनी संपला पाठिंबा दिला होता, आजच्या संपामध्ये बँक, राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी, विमा, महापालिका, नगरपालिका, बेस्ट, एसटी, पोर्ट, रेल्वे इत्यादी उद्योगातील कामगारांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला, शहरातून कामगार वर्ग तर ग्रामीण भागातून शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले होते.

 

 

मुंबईमध्ये सीएसटी ते ठाणे आणि बांद्रा ते बोरिवली येथे कामगारांनी मानवी साखळी तयार केली होती. कर्नाक बंदर येथे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे गोदी कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे येथे हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मानवी साखळी करून आंदोलन केले. मुंबईत बीएसटी डेपो तर महाराष्टात एसटी डेपोमध्ये कामगारांनी निदर्शने केली.

 

महाराष्ट्रात चारशे तालुक्यात तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करून निवेदने देण्यात आली. काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भारत बंद आंदोलनात सोशल डिस्टन्स चे तंतोतंत पालन करण्यात आले. महाराष्टात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. आजच्या भारत बंद आंदोलनात मेधा पाटकर, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन, कामगार नेते कॉ. विश्वास उटगी, कॉ. डी. एल. कऱ्हाड, संजय वढावकर, भाई जगताप, एस. के. शेट्ये, विवेक मोन्टेरो, एम. ए. पाटील, शंकर साळवी, अब्दुल गनी सारंग, ठाकूर, शशांक राव, हनुमंत ताटे, संदीप शिंदे, निवृत्ती धुमाळ, मिलिंद घनकुटकर, नंदू राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, दिलीप पवार, विजय कुलकर्णी, उदय भट, मिलिंद रानडे, इत्यादी कामगार नेते विविध ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here