यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा न्यायमूर्ती वाय.व्ही.चंद्रचूड स्मृती पुरस्कार माननीय शरद पवार यांच्या हस्ते आदित्य अवधूत अनुराधा पेडणेकर यांना प्रदान

yashwantrao-chavan-pratishthan

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून दिला जाणारा न्यायमूर्ती वाय.व्ही.चंद्रचूड पुरस्कार यंदा श्री.आदित्य अवधूत पेडणेकर यांना जाहीर झाला असून, ते मुंबई विद्यापीठाच्या एल.एल.एम च्या डिग्री परीक्षेत सर्व विद्यार्थ्यातून सर्वप्रथम आले आहेत.

 

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई येथील सभागृहात माजी केंद्रीय कृषी मंत्री व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते श्री आदित्य पेडणेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, संचालिका सुप्रिया सुळे , जनरल सेक्रेटरी शरद काळे, एम.के.सी.एल चे विवेक सावंत उपस्थित होते.रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here