मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करणारी व खास करून गरीब विद्यार्थी वर्ग, वंचित, गोरंगरीब, रोजंदारी मजूर ,आदिवासी व इतर गरजू वर्गासाठी काम करणाऱ्या मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीतील गीतांजली रेल्वे कॉलनी लगतच्या झोपडपट्टीतील मुलांना शिकवायला येणाऱ्या डोअर स्टेप स्कूलमधील साठ विद्यार्थ्यांना ( ज्यांची शाळा बस मध्येच भरते ) दिपावली निमित्ताने दिवाळी स्वीट,ब्लॅंकेट आणि किराणा किट ( तांदूळ ,डाळ,गव्हाचे पीठ, साखर, रवा, कोलगेट, साबण, फराळ, बिस्किट पुडा ) देऊन मदत करण्यात आली.

लॉकडाउन काळात जॉयच्या वतीने सुरू झालेले हे मदतकार्य आज अनलाॅक असले तरीही अविरतपणे सुरूच असून आतापर्यंत मागील सात-आठ महिन्यात समाजातील अशा हजारो कुटूंबियांना जॉयतर्फे किराणा किट, स्वच्छता किट व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश हिरवे यांनी सांगितले व पुढेही हे कार्य सुरू राहणार असल्याचे या निमित्ताने त्यांनी नमूद केले.
या साठ विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी दिलीप कदम , सूर्यकांत आंग्रे , अजित वैद्य , प्रमोद निकते , क्षीरसागर बंधू , तीलोत्तमा मॅडम , चंद्रशेखर सावंत , राहुल जाधव , दत्ता रातवडकर , सूर्यकांत सालम , फिलिप सर , निलेश कानभार, प्रभा सोलंकी मॅडम, ज्योती मॅडम , जंगले सर , लीना मॅडम , जगदीश वाडेकर , सरोज शिंपी मॅडम, विजय फणसेकर , सुशील नागवेकर , राजे मॅडम , विजय शानभाग , सुनील चव्हाण ,आदी सभासदांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सहकार्य केले , या मुलांना वस्तू वाटप करण्यासाठी छाया राणे, श्रद्धा कारके, चंद्रशेखर सावंत, भूषण मुळे, श्रीराम कानडे, प्रियांस हिरवे, मृण्मयी मुळे आदी जॉयचे सभासद तर तृप्ती ब्रीद, गीता बागवे, प्रिया मदाले , सुभाष अनभोरे आदी डोअर स्टेप स्कूलचा शिक्षक वृंद उपस्थित होते.अशी माहिती गणेश हिरवे यांनी दिली.







