शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – गुरुवार दि. 26 नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शिरूड येथे समाज मंदिर परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व भारतीय संविधानाचे पूजन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करून मार्गदर्शन करण्यात आले.संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले.भंते यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धवंदनेचे पठण करण्यात आले. भारतीय संविधानात अनेक बदल करण्यात आले असले तरी मूळ संविधान अबाधित राहिले पाहिजे, तसेच समस्त भारतीयांना समता ,न्याय,बंधुता याविषयी विशेषाधिकार संविधानाच्या माध्यमातून देण्यात आली आहे असे मत दादाभाई पिंपळे यांनी यावेळी व्यक्त केले .
त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराज्य यांनी देखील संविधानाचे महत्त्व गावातील लोकांना पटवून दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराज्य , रविन मोरे , गजेंद्र निकुभे ,दादाभाई पिंपळे, आकाश पाटील ,आबा निकुंभे,सुकलाल भिल,भंते उपाली,आधार आहिरे,दिप महिरे, दुलभ निकुंभे,जिभाऊ निकुंभे,जिवन महिरे,पांडुरंग निकुंभे,सत्या महिरे,सचिन महिरे, तसेच प्रस्ताविक व सुत्रसंचालन दिपक निकुंभे यांनी केले आभार प्रदर्शन आबा निकुंभे यांनी केले तसेच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.







