डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांच्या कार्याचे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केले कौतुक

ralegan-siddhi

राळेगण सिध्दी (प्रतिनिधी कमल कचर कर्डक) – डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना दादासाहेब फाळके कोरोना योध्दा पुरस्काराने मुंबई येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

 

डॉ. श्रीकांत धुमाळ हे पुण्यामध्ये राहत असुन लॉकडाऊन कालावधीत गरजु नागरिकांना अत्यावश्यक अन्नधान्य किट वाटप केले व सर्वात जास्त आदिवासी पारधी समाजातील गरजु परिवारांना अत्यावश्यक अन्न धान्य किट दिले पौलिसाना चहा नास्टा सॉनिटायझर मास हॉडगोज वाटले याबद्दल संस्थापक व अध्यक्ष कल्याणजी जाना व अंकिता जाना यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे.

anna-hajare
आज त्यांची राळेगण सिध्दी येथेजेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट झाली स्व:त आण्णा हजारे यांनी डॉ. श्रीकांत धुमाळ यांचे तोंड भरून कौतुक केले व स्तुती केली व मनापासून अभिनंदन केले आर्शिवाद दिला. तसेच आण्णांनी आता पुस्तक लिहीण्या ऐवजी कार्यकर्त्यासाठी व्हिडीओ क्लीप तयार केल्या आहेत. त्यात आण्णा म्हणाले की आपली सर्व कायद्याची नवीन माहिती पाणशेत असे अनेक माहिती त्यात अनुभवासहीत सांगितली आहे.जवळ जवळ 55 मिनिट चर्चा केली

 

यावेळी अण्णांनी सुनिल ज्ञानदेव भोसले (संपादक स्टार टि.व्ही ९, उपाध्यक्ष. अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ,मराठवाडा केसरीचे पत्रकार पुणे ग्रामीण,हिंदुसम्राट पत्रकार ) पारधी समाजातील तरुण सुनिल ज्ञानदेव भोसले यांची आखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे असा उल्लेख करून, कौतुक केले. यावेळी अखिल वारकरी सघाचे मावळ तालुका अध्यक्ष आप्पा भेगड उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here