कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) – सर्च मराठी फाऊंडेशन व मीडिया ग्रुप यांच्या वतीने कोल्हापुरातील युवा उद्योजक आणि प्रतिष्ठित नागरिक माननीय मोहसीन साजिद खान (उस्ताद) यांना नुकतेच राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार २०२०-२०२१ ने सन्मानित करण्यात आले .ऑटोमोबाइल क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
हा पुरस्कार स्वीकार करीत असताना या पुरस्काराचे सर्व श्रेय त्यांनी आपले वडील पैगंबरवासी साजिद गुलाब खान( उस्ताद) व आपले सर्व कर्मचारी यांना दिले.








