भाजपा चोपडा मंडलच्या वतीने म.ज्योतिबा फुले पुण्यतिथी व स्व.उदयजी वाघ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

chopada-bjp

चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – शनिवार दिनांक २८/११/२०२० शनिवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी व स्वर्गीय बापूसाहेब उदयजी वाघ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भाजप चोपडा मंडळाचा वतीने वेले येथील मानवसेवा केंद्रात मनोरुग्णांना(प्रभु)सकाळी १२.०० वाजता फळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

याप्रसंगी कार्यक्रमास तालुकाध्यक्ष पंकज पाटील, जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील, अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष संजय श्रावगी, सरचिटणीस सुनिल सोनगिरे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी सभापती आत्मराम भाऊ,जिल्हा चिटणीस राकेश पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, नरेंद्र पाटील,देवा बापु पाटील,भाईदास कोळी, विजय बाविस्कर,सरचिटणीस सुनिल सोनगिरे,गोपाल पाटील,संजय श्रावगी,राज घोगरे, भुषण महाजन,भरत सोनगिरे,विजय पाटील,प्रतिक अहिरे, मोहित भावे व भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.

 

bjp-chopada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here