अरविंद सावंत यांच्या नावे फेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन पैश्यांची मागणी

arvind-sawant

मुंबई (हितेश मिस्त्री) – शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने बोगस सोशल मीडिया अकाऊंट तयार करुन पैशांची मागणी केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अरविंद सावंत यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे दक्षिण मुंबई मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने खोटे अकाऊंट तयार करुन त्याद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती अरविंद सावंत यांना मिळाली. त्यानंतर खुद्द अरविंद सावंत यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसेच, नागरिकांनांही सतर्क राहण्याचं आवाहन केलं.

 

सावंत यांच्या नावाने त्यांची छायाचित्रे वापरुन सोशल मीडियावर खोटी खाती तयार करण्यात आली आहेत. सावंत यांची छायाचित्रे, याबाबतची माहिती यामध्ये देण्यात आली आहेत. या खात्याच्या माध्यमातून अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्टही पाठवण्यात आल्या असून त्यानंतर चॅटवर संदेश पाठवून पैसे पाठवण्याची मागणी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

 

याबाबतची माहिती खासदार सावंत यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच, “अशा प्रकारची फ्रेण्ड रिक्वेस्ट अथवा पैशांसाठीचा संदेश आपल्या नावाने आल्यास कृपया त्याकडे दुर्लक्ष करावे व त्याला प्रतिसाद देऊ नये”, असे आवाहन अरविंद सावंत यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here