श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते साप्ताहिक कोकण संध्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

udayanraje

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – पनवेल तालुका व रायगड जिल्ह्यामध्ये सत्य मांडण्यासाठी व डॅशिंग पत्रकारिता करण्यासाठी असलेले हक्काचे व्यासपीठ म्हणून साप्ताहिक कोकण संध्या चे नाव अग्रेसर आहे. गेली 15 न चुकता प्रसिद्ध होणारे व कोणाच्याही दबावात न येता नागरिकांच्या समस्या मांडणारे साप्ताहिक म्हणून कोकण संध्या प्रचलित आहे. साप्ताहिक कोकण संध्या चा सन २०२० चा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते आज रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी जलमंदिर सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

 

 

यावेळी उदयनराजे भोसले महाराज यांचे स्वीय सहाय्यक व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस तथा साप्ताहिक कोकण संध्याचे मुख्य संपादक केवल महाडिक, सहचिटणीस सचिन लोखंडे, सुभाष गजरे, सुनील वरेकर, गीतकार अक्षय म्हात्रे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या सुरू असलेल्या कामाबाबत माहिती घेऊन चर्चा केली. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये संघटनेचे कार्य जनाहिताचे आहे त्याबद्दल छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.

 

 

यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लेव्हलला संघटनेच्या कार्यात येणाऱ्या काही प्रशासकीय अडचणींबाबतही महाराजांशी चर्चा केली. यावेळी छत्रपती खासदार उदयनमहाराज यांनी तुम्ही काम करा बाकीचे मी बघून घेतो असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला. महाराजांच्या या पाठिंब्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून राजे प्रतिष्ठान कामगार सेना ही जनतेसाठी कायमच लढेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here