कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोरोनायोध्दा आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

corona-yodha-purskar

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – जोगेश्वरीतील लेट सुमित्रा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संस्थेचे सर्वेसर्वा व सामाजिक कार्यकर्ते श्री अनुरुद्र नारकर यांनी आज स्क्वाटर्स कॉलोनी आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य परिचारिका सौ सायली मिर्लेकर यांचा व त्यांच्या संपूर्ण टीमचा प्रमाणपत्र, शाल व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार केला.

 

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात मनपाच्या या आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरवातीपासूनच कोरोना रुग्णांना विलगिकरण केंद्र, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संपर्कात आलेल्या लोकांना देखील समुपदेशन करून सरकारी नियमांच्या अधीन राहून जे जे सहाय्य रुग्णांना व संबंधितांना करता येईल ते ते सर्व काही केले. हे कार्य करत असताना या कर्मचाऱ्यांनी वेळ काळ पहिली नाही, एकही दिवस सुट्टी न घेता दिवसरात्र सेवा दिली व या आरोग्य केंद्राच्या प्रमुख, सार्वजनिक आरोग्य परिचारिका सौ सायली मिर्लेकर यांनीही स्वतः विभागात जाऊन कोरोना रुग्णांना मदत केली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेविकानी व सर्व स्टाफनी कौतुकास्पद काम केले याचीच दखल घेऊन आज श्री.अनुरुद्र नारकर यांनी या सर्वांचा सत्कार करून त्यांचे आभार मानून त्यांना प्रोत्साहन दिले.

 

या सत्कारप्रसंगी बोलताना सौ. सायली मिर्लेकर म्हणाल्या की, ” के/पूर्व विभागाच्या आरोग्य खात्याच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ ऊर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीं आमचे कर्तव्य केले व कोरोनाच्या काळात संशयित रुग्ण व कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना तसेच संपर्कात आलेल्या लोकांना प्रथम मानसिक आधार देऊन त्यांना धीर देणे गरजेचे असते व त्यांना रुग्णालयात व विलगिकरण केंद्रात, उपचारासाठी दाखल करण्यात येते व काही रुग्णांना सोयीनुसार घरीच विलगिकरण करण्यात येते ते माझ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी व स्वयंसेविकानी उत्तम काम केले. तसेच समाजातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनीही आम्हांला मोलाचे सहकार्य केले त्यांचेही मी आभार मानते.”

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here