आमदार व भाजपा मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या नामफलकाचे अनावरण

auto-namphalak

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कांदिवली पूर्व, मुंबई येथील लोखंडवाला काॅम्पलेक्स येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनची एच.डी.एफ.सी.बॅंक लोखंडवाला काॅम्पलेक्स, जय माता दी विभाग, कमिटी तर्फे मीटर रिक्शा स्टॅंण्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली.

 

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शा स्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेची गरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्याठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झाले नाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मिटर रिक्शा स्टॅण्डची निर्मिती करुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.

 

कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला काॅम्पलेक्स, एच.डी.एफ.सी. बॅंक येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या मुख्य उपस्थितीत आमदार व भाजपा मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांच्या हस्ते रविवार दि. 29 नोव्हेंबर, 2020 रोजी मीटर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे लोखंडवाला काॅम्पलेक्स, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व,मुंबई येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

उद्घाटन समारंभाला स्थानिक नगरसेविका सुरेखाताई पाटिल, भाजपा कांदिवली विधानसभा अध्यक्ष सुधीर शिंदे, मनोज पाटिल, धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष विजयशंकर मिश्रा, एच.डी.एफ.सी.बॅंक लोखंडवाला काॅम्पलेक्स, जय माता दी विभाग, कांदिवली पूर्व,मुंबई विभाग कमिटी अध्यक्ष राकेश यादव, उपाध्यक्ष कल्लू प्रसाद वर्मा, मुंबई उपाध्यक्ष मोहन जाधव, कांदिवली स्टेशन पूर्व कमिटी अध्यक्ष शिवाजी साळुंखे, उत्तर मुंबई उपाध्यक्ष शिवाजी शिंदे कमिटी मेंबर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here