मोबाईल स्नॅचिंग करणारे आरोपी अटक करून ०२ गुन्हे उघडकीस आणले

panvel-crime

पनवेल (प्रतिनिधी विकास राठोड) – कोनगांव पोलीस ठाणे, भिवडी गुन्हा रजि नं. 1 २७४/२०२० भा.द.वि कलम ३९२, ३४ मधील फिर्यादी नामे-मोहम्मद ताहीर नुर मोहम्मद खान वय ३६ वर्षे, व्यवसाय- नोकरी रा, भंडार भवन, इस्तीया मस्जीदचे जवळ, मलबारी चाळ, कुर्ला (प), मुंबई-०७ हे दिनांक २७/११/२०२० रोजी सायंकाळी ०७:३० वा. यशवंत हॉटेलच्या समोर, रांजणोलीनाका येथे बसची वाट पाहत थांबले असता, दोन इसम नंबरप्लेट नसलेल्या डिओ मोटार सायकल वरून येवून फिर्यादी यांचे हातातील विवो प्रो १७ मोबाईल जबरीने खेचून चोरी करून नेलेबाबत दिलेल्या तकारीवरून दिनांक २९/११/२०२० रोजी गुन्हा दाखल होता.

 

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी तपास करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कोनगांव पोलीस ठाणेचे सपोनि/नितिन सुर्यवंशी व गुन्हे तपास पथकाचे सपोनि/अभिजीत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रांजणोली नाका येथे सापळा लावून आरोपी नामे १) रिजवान अब्दुल मतीन अन्सारी वय २० वर्षे, रा. जुम्मन पानटपरीच्या मागे, घुघटनगर, कापतलाव, जैतुनपुरा, भिवंडी २) फिरोज सलाउददीन शेख वय १९ वर्षे, रा. अल्ला मस्जिदच्या पाठीमागे, कापतलाव, जैतुनपूरा, भिवडी यांना ताब्यात घेवून त्यांनी कोनगांव गुन्हा रजि नं. २७४/२०२० भा.द.वि.कलम ३९२, ३४ व गुन्हा रजि नं. २७३/२०२० भा.द.वि.कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल हस्तगत करून २ गुन्हे उघडकीस आणले आहे.

 

सदर आरोपी नामे १) रिजवान अब्दुल मतीन अन्सारी वय २० वर्षे, रा. जुम्मन पानटपरीच्या मागे, घुघटनगर, कापतलाव, जैतुनपुरा, भिवंडी हा कोनगांव पो.स्टे. १) गुन्हा रजि नं. ६ ६५/२०२० भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे २) गुन्हा रजि नं. २३१/२०२० भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी आहे. चोरांकडून जप्त केलेल्या मुदमालाचे वर्णन खालीलप्रमाणे. १) १०,९९९/- रू. किंमतीचा ओपो कंपनीचा ओ-५ मोबाईल त्याचा IMEI नं. ८६९९१२०४५६५१७९७, ८६९९१२०४५६५१७८९ असा जुवाकिसु.(कोनगांव पो.स्टे. गु.रजि.नं. २७३/२०२० मधील) २) २५,०००/- रू. किंमतीचा विवो कंपनीचा १७ प्रो मोबाईल त्याचा IMEI नं. ८६३२६४०४७४०४७३४, ८६३२६४०४७४०४७२६ असा जुवाकिसु..(कोनगांव पो.स्टे.गु.रजि.नं. २७४/२०२० मधील) ३) ३०,०००/- रू. किंमतीची होन्डा कंपनीची डिओ स्कुटी काळया रंगाचा मागे पुढे नंबर प्लेट नसलेली तिचा चेसिस नं. ME4JF39KNJ7009541 व इंजिन नं. JF39E74051528 असा असलेली जुवाकिंसु. ६५,९९९ /- रू. एकूण. असा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

 

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, प.प्रा. विभाग, ठाणे अनिल कुंभारे, पोलीस उप आयुक्त, परि-२, भिवंडी योगेश चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) प्रशात ढोले, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/नितिन सुर्यवंशी, सपोनि/अभिजीत पाटील, सपोउपनि/सुर्यवंशी, पोहवा/४३३३ नलावडे, पोना/४६६१ किरण पाटील, पोना/६५६८ मासरे, पोशि/७२२१ कृष्णा महाले, पोशि/८१६३ अविनाश पाटील, पोशि/७२०३ गणेश चोरगे, पोशि/१६७९ देवरे यांनी केलेली असुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि/नितिन सुर्यवंशी व पोउपनि/जिवन शेरखाने हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here