राजारामबापू उद्योग समुहाला दुष्काळी तालुक्यांची नवी ओळख बनवा; सादिक खाटीक यांचे जयंतराव पाटील यांना साकडे.

loknete-rajaram-bapu

आटपाडी (प्रतिनिधी) – जयंतराव पाटील आपल्या मार्गदर्शना खालील राजारामबापू उद्योग समुहाच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यांमध्ये विविध उद्योग, व्यवसाय आणि विकासात्मक व्यवस्था निर्माण करीत , हीच क्रांतीकारक चौफेर विकास उद्योगांची शृखंला दुष्काळी तालुक्यांची नवी ओळख बनवा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा मौलाना आझाद विचार मंच चे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी यांनी केले आहे .

 

 

sadik-khatik

राज्यात १०० हून दुष्काळी तालुके असून सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील माण, खटाव ,आटपाडी ,खानापूर, जत, कवठेमहंकाळ, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे आटपाडी तालुक्यात आटपाडी, नेलकरंजी ,खरसुंडी ,घरनिकी , झरे, राजेवाडी, दिघंची, उंबरगांव, पिंपरीखूर्द, माडगूळे, शेटफळे या इतर तालुक्यांना जवळ ठरणाऱ्या गावात, ही उदयोग व्यवसायाची शृखंला उभारून हजारो दुष्काळी कुटुंबात नव चैतन्य निर्माण करावे असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी या पत्रात आपले परमपुज्य पिताश्री महाराष्ट्राचे नेते आदरणीय राजारामबापू पाटील यांचा आणि दुष्काळी, उपेक्षित, मागास आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ, माण, खटाव, फलटण, खंडाळा, तालुक्यांचा सुमारे ४० वर्षापासूनचा घनिष्ट संबध .

 

वयाच्या पंचवीशी नंतरच्या पाच सात वर्षात सांगली जिल्ह्या समवेतचा, त्यावेळचा एकसंघ सातारा जिल्हा फिरून राजारामबापूंनी शेकडो गांवाना ,हजारो कार्यकर्त्याना आपलेसे केल्यानेच राजारामबापू , १९५२ ते ५७ या पंचवार्षीक मध्ये सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी, दुष्काळी तालुक्यांशी असलेली आत्मीयतेची भावना वृद्धींगत करण्यासाठीच दुष्काळी आटपाडी तालुक्यातील वडिलधारी, लढवय्ये ,जिगरबाज नेतृत्व कै .रस्तुमरावबापू नानासाहेब सेनासुभे चव्हाण – देशमुख ( आटपाडी ) यांना आपल्या समवेत सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष केले .बापूंनी लोकल बोर्डाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर आणि विशेषतः दुष्काळी तालुक्यांमध्ये गावोगांव प्राथमिक शाळा सुरु केल्या . पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनीक विहीरी, बारव , आड ,पाणवठे,शेतीच्या पाण्यासाठी पाझर तलाव, गाव तलाव , मोठे तलाव साकारण्यात तसेच आरोग्य व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यात राजारामबापू यशस्वी झाले . त्यानंतरच्या काळातही बापूंनी दुष्काळी तालुक्यांसाठी मोठे काम केले , औद्योगीक वसाहती, विविध उद्योग, साखर कारखानदारी , गावोगावी विजेची व्यवस्था साकारताना त्यांनी दुष्काळी भागाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला . शेकडो ज्येष्टां बरोबर हजारो तरुणांना सर्वच क्षेत्रात आदरणीय बापूच दीपस्तंभ ठरले .
आदरणीय बापूंच्या नंतर राजकारणात आपण आलात , गत ३५ वर्षात देशाला दिपवणारे मोठे काम आपण राज्यभर केले आहे . टेंभू, म्हैशाळ, ताकारी सारख्या असंख्य पाणी योजनांसाठी आपणच (जयंतराव साहेब ) मसिहा बनलात . गत ३३ वर्षाच्या अथक भ्रमंतीतून सर्वच उपेक्षित, मागास, दुष्काळी तालुक्यांना , तेथील फाटक्या लोकांना मोठा आधार देण्याची भूमिका इमानदारीने तुम्ही निभावली आहे .सर्वच दुष्काळी तालुक्यातील लाखो करोडो जीवांची, वृक्ष वल्ली, पिकांची पाण्याची तृष्णा भागविण्याचे नेक काम आपल्या पिताश्रीनी आणि आपण , शेकडो संकटे पार करीत मोठ्या चतुराईने केले आहे .

 

बोरी ,बाभळी, खैर, ज्वारी,बाजरीचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुष्काळी माणदेशी पटटयाने अनेक क्षेत्रात डोळे दिपवणारी कामगिरी केली आहे . सोने चांदी गलाई व्यवसायाच्या निमित्ताने देश परदेशात सेवा देणाऱ्या या बांधवांनी , देशातल्या सर्व शहरामध्ये या दुकानदारीचा अभिमानास्पद ठसा उमटविला आहे . राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रेरणेतून साकारलेल्या फलोत्पादन योजनेला खऱ्या अर्थाने सत्यात उतरविण्याचे काम या माणदेशी पट्टयातल्या शेतकऱ्यांनी केले . त्यांच्या अथक श्रमातून साकारलेल्या साऱ्या जहॉला भूरळ पाडणाऱ्या अनार – डाळींब फळ पिकाने केले . हजारो टन परदेशी जाणाऱ्या अनार ने जागतिक किर्ती ,उंची, दर्जा संपादन केलाच . तथापि या सोनेरी अनार सह अन्य फळ पिकांवर प्रक्रिया करून ज्यूस, औषधे आणि खत निर्माण करणारी कारखानदारी , संशोधन करणारे केंद्र तातडीने उभारले जाणे गरजेचे आहे आणि देशभर माल वाहतूकीस सुलभ दरात उपलब्ध होवू शकणारी आणि परवडणारी रेल्वे वाहतूकीची सुविधा हे तर आटपाडीकरांचे ७० वर्षापासूनचे स्वप्न आहे . भारतभर विखुरलेला गलाई बांधव, पोर्ट ट्रस्ट सारख्या विविध ठिकाणी हमालीत असणारे हजारो माणदेशी , विविध राज्यातल्या कापड गिरण्या ,उद्योगां मध्ये काही पिढ्यांना समर्पित करणारे हजारो दुष्काळ ग्रस्त विणकर , कामगार , माणदेशातल्या ६०० गावांमध्ये शेळी, मेंढी, दुभती ,कष्टाळू खिलार जनावरे सांभाळणारे हजारो पशुपालक यांच्या दृष्टीनेही रेल्वे वाहतूक मोठी पर्वणी ठरणार आहे . गदिमांनी लिहीलेल्या,
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या
मामांच्या गावाला जावू या !
या बालगितांने रेल्वेच्या स्वप्ना बाबत तिसऱ्या पिढीलाही आजअखेर आशावर्धक ठेवले आहे .देशाच्या प्रगतीच्या या मुख्य वाहीनी रेल्वेला आटपाडी मार्गे विजापूर – बारामती आणि आटपाडी मार्गे गुहागर – पंढरपूर अशा मार्गे सत्यात आणण्यास आपल्या प्रयत्नाला वास्तवाचे स्वरूप येवू शकेल .

 

या दुष्काळी तालुक्यांना नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला आहे . माणदेशातल्या हजारोंच्या संख्येतल्या तरुणाईला प्रत्येक तालुक्यात सर्वव्यापी सर्व सोयी, सुविधा, नियुक्त औद्योगिक वसाहती, माणदेशाचा केंद्रबिदू आटपाडी मानून आपल्या इस्लामपूरच्या राजारामबापू उद्योग समुहातील साखर कारखाना , सुतगिरणी, दुध संघ, बॅक, वीज, खत, इत्यादी निर्मिती प्रकल्पांचे प्रत्येक यूनीट आटपाडी तालुक्यात साकारण्यासाठी आपली पावले पडावीत दर्जेदार शेळ्या ,मेंढ्या ,बोकड, बकऱ्यांचे मांस परदेशी पाठवणारी कारखानदारी माणदेशी पहचान बनावी . माणदेशी आठ तालुक्यांना उपयोगी ठरेल असे भव्य जिल्हा रुग्णालय आटपाडीत अस्तित्वात यावे . तालुका मुख्यालय असलेल्या राज्यातल्या सर्व मोठ्या गावात नगर पंचायती अस्तित्वात आल्या, परंतू आटपाडीत नगरपंचायत अथवा नगरपालीका व्हावी याची मोठी मागणी असूनही या नव परिवर्तनाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत . त्यासाठी यशस्वी प्रयत्न व्हावेत . बेळगांव आणि विजापूर मार्गे बेंगलोरला जा – ए करणाऱ्या एस.टी . गाड्या तसेच आटपाडी मार्गे सोलापूर – कोल्हापूर धावणाऱ्या एस.टी च्या रातराणी गाड्या हजारोंच्या सोयीच्या ठरणार आहेत . आटपाडी तालुक्यातल्या मान्यवर , साहित्यीकांची स्मारके कला – साहित्य नगरी दर्शविणारी देशभर ख्यातकीर्त व्हावी , यासाठी राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी च्या माध्यमातून पुढकार घेतला जावा . आटपाडी तलाव ते आटपाडी शिव दरम्यान च्या आटपाडी च्या विस्तीर्ण दोन्ही ओढा पात्रातील अतिक्रमणे काढून ऑक्सीजन पार्क, चिंचबन साकारले जावे , डबई कुरणाला पक्षी अभयारण्याची मान्यता मिळावी , राज्यभर ख्यात असणाऱ्या तालुक्यातल्या मोठ्या यात्रा, देशभर महती असणारी खरसुंडी ,करगणी ची तीर्थक्षेत्रे विकासाला चालना देणारी मोठी केंद्रे व्हावीत . “दो आँखे बारह हाथ” सारखा जगविख्यात चित्रपट निर्मितीस कारणीभूत ठरलेली आटपाडीची कैद्यांची स्वतंत्रपूर वसाहत , लाखो पर्यटकां बरोबर हजारो गुन्हेगारांचे डोळे दिपविणारी, डोळे उघडणारी, कालानुरूप विस्तारणारी ठरावी. अनेक जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या शेळ्या मेंढ्याच्या बाजाराला जोडून मोठ्या जनावरांचा बाजार सुरु करण्यासाठी आपले प्रयत्न सत्कारणी लागावेत . हजारो माता भगिनीच्या हाताला काम देण्यासाठी कुटीर उद्योग ,ग्राम उदयोग, सारखे विविध महिला उद्योग, हजारो बचत गटांना पत पुरवठा करणारी महिला बँक इत्यादी शेकडो एकराच्या एकाच छताखाली आटपाडीत साकारणारी महिला उद्योग नगरी महाराष्ट्राच्या प्रगतीचे दिशादर्शक प्रतिक बनावे. बारामतीची विद्यानगरी जरी आटपाडीत साकारता आली नाही तरी इस्लामपूरच्या सर्वस्पर्शी, सर्वव्यापी शिक्षणाच्या विविध शाखांचे प्रत्येक यूनिट मग ते अभियांत्रीकी, मेडीकल पासून सर्व क्षेत्रात गरुड भरारी ची ताकद देणारी, गवसणी घालणारी शिक्षण व्यवस्था आटपाडीच्या ज्ञानगंगेची महती वाढविणारी ठरावी.राजेवाडी तलाव ते बुद्धीहाळ तलाव या १५० वर्षापूर्वीच्या ब्रिटीशकालीन मोठ्या तलावांना आटपाडी तालुक्यातल्या विविध तलावांनी जोडणारी तलाव जोड योजना फलद्रुप व्हावी . दुष्काळी कुटुंबाला प्रत्येकी पाच हजार घनमीटर पाणी देणारी समान पाणी वाटपाची योजना अस्तित्वात येण्यासाठी आपले प्रयत्न सत्कारणी लागावेत . राज्यभरातल्या शेतकऱ्यांना वीज, पाणी ,बी – बियाणे, खते ,औषधे मोफत मिळण्यासाठी प्रत्येक उद्योग ,व्यवसाय, नोकरदारां बरोबरच कमावत्या प्रत्येकाकडून शेकडा १ टक्के शेतकरी संवर्धन टॅक्स गोळा करून या शेतकरी राजाला, देशाच्या खऱ्या मालकाला सन्मानाने उभे करण्याच्या व्यवस्थेला साकारण्यात आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत, आपण हे स्वप्न सत्यात उतरविण्यात निर्णायक भूमिका घ्याल हीच प्रांजळ अपेक्षा असल्याचे सादिक खाटीक यांनी शेवटी म्हटले आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here