मुंबई (हितेश मिस्त्री) – गेल्या महिन्यात एक हरहुन्नरी नट हिंदी चित्रपटसृष्टीने गमावला. दि. १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत मे मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर सबंध चित्रपट सृष्टी ढवळुन निघाली. त्याने आत्महत्या कोणत्या कारणांसाठी केली याबाबत बरेच तर्कवितर्क वर्तविले गेले. पण सुशांतच्या आत्महत्ये संदर्भात त्यांच्या निकटवर्तीयांकडून बरीच खळबळजनक माहिती गेल्या काही दिवसात बाहेर आली आहे. हिंदी सिनेसृष्टीत चालणाऱ्या घराणे व कंपूशाही च्या त्रासामुळे व्यथित होऊन त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा दबक्या आवाजात चालू आहे. या सार्या घटनाक्रमामुळे व्यथित होऊन मुंबई स्थित सर्वोच्च न्यायालयातील निष्णात विधिज्ञ नितीन सातपुते यांनी चित्रपट सृष्टीत चालणाऱ्या घराणेशाही विरोधात आपली सुशांतच्या कुटुंबियांच्या वतीने कोर्टात लढाई देण्याची तयारी आहे. जर सुशांत सिंग राजपूत चे कुटुंबीय याप्रकरणी कोणत्याही कायदेशीर मदतीसाठी माझ्याकडे आले तर मी त्यांना नक्की मदत करेन असेही ते म्हणाले. याप्रकरणी सुशांतच्या मृत्यूस अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्यांना मी कोणत्याही परिस्थितीत मोकळं सुटू देणार नाही.
साधारण चार वर्षांपूर्वी ‘मी टू’ चळवळीने जोर धरला होता. त्यावेळी अभिनेत्री तनुश्री दत्ता ने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य व इतरां विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. काही वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर आपल्यासोबत सदर घटना घडल्याचे तिने यावेळी सांगितले होते. हा हायप्रोफाईल खटला ऍडवोकेट नितीन सातपुते यांनी आपल्या हातात घेत बऱ्याच मोठ्या लोकांशी एका अर्थी पंगाच घेतला होता. काहीसा लांबलेला हा खटला अद्याप चालू असून ऍडवोकेट सातपुते आपल्या अशील तनुश्री दत्त सोबत खंबीरपणे उभे असल्याचे पाहायला मिळते. या प्रकरणी आपले मत मांडताना ते म्हणाले की खटला लांबणे फार मनस्तापदायक असलं तरी यात आरोपीलाही जास्तच त्रास होतो. मला बातम्यांच्या माध्यमातून असे कळले की काही निर्माते अशा प्रकरणातील आरोपींना कामही देत नाहीयेत असेही पुढे त्यांनी नमूद केले.
अभिनेत्री तनुश्री दत्त हीचा लैंगिक छळ प्रकरणाचा हायप्रोफाईल खटला ॲड. सातपुते सध्या लढवत आहेत
Home Uncategorized निष्णात विधिज्ञ ॲड. नितीन सातपुते यांची सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणाचा खटला...







