मतदार संघासाठी भरघोस निधी देणार – आ.चिमणराव पाटील

जळगाव (निलेश पाटील) – जिल्ह्यातील पारोळा व एरंडोल या दोन्ही तालुक्यांमध्ये करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता.आज 07 जुलै रोजी तहसिल कार्यालय,पारोळा येथे करोनाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री खरीदीबाबत प्रांत यांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला आमदार चिमणरावजी पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत ( आमदार निधी) पारोळा व एरंडोल दोन्ही ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी 20 ( वीस ) बेड ऑक्सीजन पाईपसह पारोळा व एरंडोल तालुक्यासाठी प्रत्येकी 2,75,000 / – ( दोन लक्ष पंच्याहत्तर हजार ) रुपये असे एकुण रुपये 5,50,000 / – ( पाच लक्ष पन्नास हजार रुपये ) देण्याचे जाहीर केले तसेच यापुढे करोनाशी लढा देण्यासाठी जी काही यंत्र सामग्री लागेल उदा.रुग्णवाहिका , इतर वैद्यकीय साहीत्य त्यासाठी भरघोस निधी देण्याबाबात ठोस आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here