जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व दिशा स्पर्धा परिक्षा यांच्या तर्फे आज भारतीय संविधानाचे 500 कलम तोंडीपाठ असलेली मुलगी अलिजा मौजे मुजावर इयत्ता पाचवी रा,शिव कॉलनी हिचा सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भविष्यात तिला आयएएस ऑफिसर व्हायचे आहे असे तिने सांगितले. याप्रसंगी सुदर्शन पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, दिशा स्पर्धा परीक्षेचे उमेश सूर्यवंशी, हेमंत साळुंखे, राजेंद्र वाघमारे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक हर्षाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते







