बाजारसावंगीत पेढे वाटून गुलाल उधळून निवडीचा जल्लोश     

bajarsavangi

खुलताबाद (बाजारसावंगी प्रतिनिधी) – खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे आमदार सतिष भाऊ चव्हाण यांच्या विजयाबद्दल येथे शुक्रवारी जल्लोश साजरा करण्यात आला.

 

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सतिष भाऊ चव्हाण आमदार( विधान परिषद) यांनी   १लाख १६ हजार ६३८ पदवीधर मतदाराचे पसंतीचे मते घेवून घवघवीत यश मिळवून पुन्हा मानाचा तुरा मिळवल्या बद्दल बाजारसावंगी (ता.खुलताबाद) बाजारपेठेत श्रीमंती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार रुमाल घालून व पेढे वाटप करून, गुलाल उधळत व फटाक्याची अतिषबाजी करत आघाडी सरकारच्या नावे घोषण देत मुख्य बाजारपेठमध्ये विजयी उत्साह साजरा केला.
या जल्लोशात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच भिमराव नलावडे, तालुकाध्यक्ष युकाँ अजिनाथ साळुंके, चांद पठाण, तालुका प्रयु युवराज पाटील, कारभारी साळुंके, खविसंसं अनिल नलावडे, रामदास घुले, बाबासाहेब माळकर, बबन नलावडे, सूरेश जाधव, चेअरमन कांताराम आघाडे, अप्पाराव पाटील, सुभाष धनेधर, बंडु शिंदे सह रेल, शेखपूर, सोबलगाव, बोडखा, सावंगी, कानडगाव, ताजनापूर परिसरातील पक्ष कार्यकर्ते जल्लोशात सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here