नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत इमारती करिता निधी द्या – युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी

prashant-marotkar

अमरावती (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दौऱ्यादरम्यान खंडेश्वर संस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित निधी द्या, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नांदगाव तालुक्यातील खराब झालेली रस्ते तात्काळ दुरुस्त करा, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून वंचित शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या अशा मागण्यांचे निवेदन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले.

 

यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे वनमंत्री संजय राठोड पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर माजी खासदार अनंतराव गुढे आनंदराव अडसूळ जिल्हाप्रमुख राजेश वानखडे सुनील खराटे श्याम देशमुख महानगर प्रमुख पराग गुडदेमाजी आमदार धाने पाटील प्रवीण हरमकर इत्यादी मंडळी उपस्थित होते

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here