पारोळा (प्रतिनिधी) – शुक्रवार पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी सुरू असलेल्या कापुस खरेदी बाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अमोलदादांनी कृषि उत्पन्न बाजार समितीत कापुस विक्रीसाठी सुरू असलेल्या कामकाजाचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत मांडला.
आतापर्यंत पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीत कापुस विक्रीसाठी ५५०० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केलेली असुन आठवढ्याभरात २३०० शेतकऱ्यांना कापुस मोजमाप झाला असुन आज पावेतो ३५००० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचा कापुस लवकरात लवकर मोजमाप होणेसाठी योग्य त्या उपाययोजना बाजार समिती करित आहे.
सद्यस्थितीत बाजार समितीकडुन रोज ४५० ते ५०० शेतकऱ्यांचा कापुस मोजमाप होत असल्याचे सांगितले. तसेच पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची नाव नोंदणी सुरू असुन पारोळा तालुक्यासह इतर तालुक्यांतील नाव नोंदणीपासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी त्वरीत बाजार समितीत करावी असे आवाहन मा.दादासाहेबांनी शेतकरी बांधवांना केले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती बापुसो.दगडु पाटील, पारोळा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.आर.बी. पाटील सर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेबसो. चतुर पाटील, आबासो.मधुकर पाटील, दादासो.सुनिल पाटील, भैय्यासो.प्रेमानंद पाटील, प्रा.बी.एन.पाटील सर व पत्रकार उपस्थित होते.







