मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण.) – सिद्धकला तायक्वांडो अकादमी मधील तनिष्का वेल्हाळ हिने नुकत्याच पार पडलेल्या २०२० खुल्या ऑनलाइन सिओल कप इंटरनॅशनल तायक्वांडो स्पर्धेमध्ये पूमसे या प्रकारांमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
या स्पर्धेत संपूर्ण जगभरातून विविध राष्ट्रांच्या खेळाडूंनी विविध वयोगटात सहभाग घेतला होता. तनिष्का ही विबग्योर स्कूलमध्ये शिकत आहे. काही दिवसांपूर्वी गोवा यांनी तायक्वांडो ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सुद्धा तनिष्का वेल्हाळ हिने सुवर्ण पदक जिंकले होते.
तिचे प्रशिक्षक विक्रांत देसाई यांनी सांगितले की, जर तिने अशीच मेहनत घेतली आणि जर सातत्याने सराव केला तर ती भारत देशासाठी मोठ्या स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करेल. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचे तसेच प्रशिक्षकांचे सिद्धकला तायक्वांडो अकादमीचे संघ प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक मास्टर जयेश वेल्हाळ यांनी अभिनंदन केले आहे.







