खरसुंडी (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे विजयी आमदार अरुण गणपती लाड व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे विजयी आमदार प्रा.जयंत आसगावकर या दोन्ही विजयी उमेदवारांचा विजयी आनदोत्सव सिद्धनाथनगरी खरसुडीत साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय , शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून हा आनंद द्विगुणीत केला . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आनंदराव बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा केला गेला .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक , शिवसेनेच्या नेत्या आटपाडी च्या सरपंच सौ. वृषालीताई धनंजयराव पाटील, डॉ. श्रीनाथ लक्षमणराव पाटील, डॉ . सौ .शीलाताई श्रीनाथ पाटील खरसुंडीचे माजी उपसरपंच अर्जून पुजारी, काँग्रेस आयचे नेते सांगली जि.म. सह.बॅकेचे माजी व्हा.चेअरमन खरसुंडीचे माजी सरपंच शशिकांत देठे, खरसुंडीचे नेते दिलीपराव सवणे , कॉंग्रेस आयचे किरण पवार, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दतात्रय यमगर, राष्ट्रवादी युवकचे आटपाडी तालुका माजी अध्यक्ष अमित ऐवळे , राष्ट्रवादी च्या सामाजीक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत,राष्ट्रवादी तालुका चिटणीस विजय पुजारी , शंकरराव गिड्डे, बाळासाहेब निचळ , गणेश पाटील , सुनिल पाटील, मदन जावीर, विवेक पुजारी , किरण पुजारी,इत्यादी अनेक मान्यवर या विजयोत्सवात सामील झाले होते . या कार्यक्रमाचे संयोजन तालुका चिटणीस विजय पुजारी सर यांनी केले .







