महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे अभिवादन

shahada-abhivadan

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतिने समितीच्या कार्यालयात प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली अभिवादन सभा व प्रतिमा पुजन कार्यक्रम संपन्न झाला.

 

प्रथम जिल्हा उपाध्यक्ष अनिल जाधव, ओझर शहर कार्प्रयाध्यक्षा सौ. शारदाताई जाधव यांचे हस्ते भं.बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. प्रदीपनाना गांगुर्डे यांचे हस्ते द्विपप्रज्वलीत करण्यात आले. या वेळी बुध्दवंदना त्रिसरण, पंचशिल व भिमस्तृती, घेण्यात आली.

 

या प्रसंगी शहर अध्यक्ष राजु सोनवणे, महीला शहराध्यक्षा रेखा जाधव, युवाध्यक्ष नितिन ढेंगळे, मधुकर गवारे, कमलेश डांगळे, सरला गवारे, मंगला पगारे, यांनी अभिवादनापर आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमास मंगल पगारे, कलाबाई आहीरे, बेबी आहीरे, संदीप ढेगळे, जयश्री केदारे, निकिता मोरे, संगिता जाधव, माधुरी जाधव, रंजना पगारे, करण जाधव, रवि धिवरे, राजेंद्र जाधव, सागर जाधव, नंदा जाधव आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सरणेतय घेवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रासंचालन राजु सोनवणे यांनी तर आभार रेखा जाधव यांनी मानले.

shahada-mahaprinirvan-din

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here