महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात तीन वाचनालयांना पुस्तक भेट व एका वाचनालयाचे उदघाटन….!

rashima-foundation

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – ‘तुमच्याकडे २ रुपये असतील तर १ रुपयांची भाकरी घ्या आणि १ रुपयांचे पुस्तक घ्या.’भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर ‘पुस्तक’तुम्हाला जगावे कसे.?हे शिकवेल.! असे बाबासाहेब आपल्या बांधवांना नेहमी सांगत असत.आज बाबासाहेबांचे हे विचार आमच्या राज्यात वाचन चळवळ राबविणाऱ्या ‘युवकमित्र परिवाराला’ प्रेरणा देऊन जातात.

 

rashima-vachanalaya

 

 

बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श घेऊन आज ‘उमराणी बुll ता.धडगाव जि.नंदूरबार येथे ‘राशीमा सार्वजनिक वाचनालयाची’ स्थापना करण्यात आली. उमराणी बु.येथील मूळगाव असलेले दोंडाईचा येथिल प्रा.शिवाजी पावरा सर यांनी गावातील नोकरदार अशा 22 गावकऱ्यांना एकत्र करत वाचनालय स्थापन केले.या वाचनालयासाठी राज्यात ‘गाव तेथे वाचनालय’उपक्रम राबविणाऱ्या ‘युवकमित्र परिवार,नंदूरबार’मार्फत १०० पुस्तके भेट देण्यात आली.सदर वाचनालयाचे उदघाटन धडगाव तहसीलदार श्री.सपकाळे साहेब,गटविकास अधिकारी श्री.गोसावी साहेब,प्रा.शिवाजी पावरा व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.कवी करणसिंग तडवी सर यांनी सूत्रसंचालन केले.

 

तसेच नेहरू युवा केंद्र,नंदूरबार सलग्न युवकमित्र परिवारामार्फत नेहरू युवा केंद्र कार्यालय,नंदूरबार येथे ‘माध्यमिक विद्यालय,मोग्राणी ता.नवापूर व माध्यमिक विद्यालय,देवपूर ता.नंदूरबार’या दोन शाळांना प्रत्येकी १०० बालवाचनाची पुस्तके भेट देण्यात आली.प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे नंदूरबार जिल्हा समन्वयक श्री.अर्श कौशिक हे अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्रचे प्रवीण महाजन,देवपूर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर साळुंखे सर,श्री.सूर्यवंशी सर,मोग्राणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर,लक्ष्मीकांत निकम सर हे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गणेश ईशी,अजय भोई यांनी परिश्रम घेतले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here