ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न प. पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लुईस वाडी ठाणे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे, ॲड, महेश पाटील महिला आघाडी सौ प्रमोदिनी कांबळे ,सौ प्रीती खानेकर ॲड तृप्ती पाटील ठाणे जिल्हा अध्यक्षा , सदस्य , पदाधिकारी यांच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच ठाणे जिल्ह्याचे संघटक मनोज राणे यांच्या समवेत कोर्टनाका व ठाणे स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.







