उसाची ट्रॉली उलटून मळगे खुर्दचा तरुण ठार

satara-death

सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – मळगे खुर्द ते मळगे बुद्रुक (ता.कागल) च्या दरम्यान असलेल्या ओढ्यानजीक पुलावर उसाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून सत्यजित दत्तात्रय पाटील (वय 23, रा. मळगे खुर्द) हा तरुण जागीच ठार झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला. याची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात झाली आहे.

 

 

सत्यजित पाटील हा ट्रॅक्टर ट्रॉलीतून (एमएच 09 जे 4496) कारखान्याला ऊस घेऊन मळगे बुद्रुककडे निघाला होता. मळगे खुर्द ते मळगे बुद्रुकच्या रस्त्यावर अस्वले ओढ्याजवळील पुलावर ट्रॅक्टर आला असता तो अचानक उलटला. यामध्ये सापडून चालक सत्यजित पाटील जागीच ठार झाला.सहा वर्षापूर्वी सत्यजित याचे वडील दतात्रय दशरथ पाटील मुरगूड-निपाणी रोडवर ट्रॅक्टर उलटूनच ठार झाले होते. अपघाताची माहिती समजताच गावात हळहळ व्यक्‍त होत होती. त्याच्या मागे पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. आधिक तपास सहायक पोलिस निरीक्षकविकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील मोरे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here