जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन देवरुख येथे लोकनिर्माण साप्ताहिक वृतपत्र कोविड – 19 दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

loknirman-weekly

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – देवरुख येथील हॅाटेल पर्वती पॅलेस मध्ये लोकनिर्माण वृतपत्राचे कोविड – १९ या दीपावली २०२० विशेषाकांचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री.बाळकृष्ण कासार , प्रमुख पाहुणे चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातले अभिनेते असिफ रेडिज, अपना बँकेचे व्यवस्थापक संतोष केसरकर, देवरुख कोपसापचे अध्यक्ष लिंगायत, देवरुख अपंग संस्थेचे अध्यक्ष विलास कदम, सामाजिक कार्यकर्ते य़ुय़ुत्सु आर्ते, धनाजी भांगे, संदिप गुडेकर, प्रमोद आंब्रे, नांदलसकर, रंजना कदम, विश्वास भोसले, सचिन कोेरे, मुरलीधर मांगले आदी मान्यवर उपस्थित होते.



या प्रकाशनाच्या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या ठिकाणी दिवाळी अंकाची विक्रीही करण्यात आली. या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आणि सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते लोकनिर्माणचे सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here