क्रीएटीव्ह फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व तेरणा ब्लड बँक यांच्या संयुक्त वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त महारक्तदान शिबीरचे आयोजन

maharaktdan-shibir

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – क्रीएटीव्ह फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व तेरणा ब्लड बँक यांच्या संयुक्त वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, बोधिसत्व, भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त महारक्तदान शिबीरचे आयोजन नेरुळ नवी मुंबई श्री गावदेवी माता मंदिर सेक्टर १२ येथे करण्यात आले होते यावेळी जवळ पास २९ हुन अधिक जणांनी आपले रक्तदान केले तसेच प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आले व भेट म्हणून कप ही वस्तु देण्यात आली.

 


रक्तदान शिबिर रविवार सकाळी १० ते दुपारी ०३ या दरम्यान आयोजित केले होते. या प्रसंगी मा आमदार संदीप नाईक साहेब,मनसे जिल्हाअध्यक्ष गजानन काळे ,दिलीप घोडेकर, सुरज पाटील, गिरीश म्हात्रे , व इतर मान्यवर यांनी उपस्थिती दर्शविली. आज कोरोना च्या महाभयंकर परिस्थितीत अशा प्रकारचे आरोग्य शिबीर भरवून समाजपयोगी कार्य खूप निकडीचे आहेत .रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि सर्व रक्तदात्यांचे आभार क्रीएटीव्ह फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here