वर्धा (जिल्हा प्रतिनधी मनोज बाचले) – नवनिर्वाचित आमदार अभिजीतदादा वंजारी यांचा नागपूर येथील त्यांचे निवासस्थानी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेने भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व जूनी पेन्शन लागू करण्यासंबंधी त्यांनी दिलेल्या वचननाम्याची त्यांना यावेळी आठवण करून देण्यात आली.
यावेळी जूनी पेन्शन हक्क संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख आशुतोष चौधरी, राज्यसमन्वयक सुशील गायकवाड, वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, जिल्हा सचिव प्रमोद खोडे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत पारधी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज पालिवाल, भंडारा जिल्हाध्यक्ष संतोष मडावी तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व पेन्शन फायटर उपस्थित होते.









