मुंबई (प्रतिनिधी नवलकुमार शर्मा) – दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी, नवाबभाई मलिक व ॲड.निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस – उत्तर मुंबई जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली “भारत बंद” ला पाठिंबा देण्यात आला.
यावेळी किरण मोरे – युवक अध्यक्ष, मयुर पवार – उत्तर मुंबई – मुख्य सचिव, फेमिदा खान – महिला अध्यक्ष, कैफ मुल्ला – दहिसर तालुका अध्यक्ष, साबीर खान – उत्तर मुंबई – उपाध्यक्ष, नरेश अनुष्ठान – सचिव आणि संबंधित उत्तर मुंबई जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. स्थानिक समता नगर पोलीस ठाण्यातील पोलीस प्रशासनाने योग्य ते सहकार्य केले.







