आटपाडी (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सिमांवर आंदोलन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा व्यक्त करण्यासाठी आटपाडीत आज जोरदार घोषणाबाजी करीत आणि संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवून पाठींबा व्यक्त करण्यात आला.
रद्द करा, रद्द करा , शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो . शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो ,अशा घोषणा देत या सर्वांनी शेतक-यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला .
आटपाडीत या देश स्तरावरच्या आंदोलनला पाठींबा म्हणून जोरदार घोषणाबाजी करून शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा नेते आनंदरावबापु पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, काँग्रेस आय पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष डी. एम . पाटील सर, जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सागर, शेतकरी नेते मुरलीधर आबा पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी आटपाडी तालुका अध्यक्ष अमित ऐवळे, शिवाजी पाटील साहेब, शहाजीराव मोटे, सुखदेव कटरे, असिफ खाटीक ,अमीर खाटीक, रोहीत भागवत ,विक्रमसिंह जाधव, कुमार तारळेकर, विकी दौडे, अतुल पाठक, अक्रम मुलाणी, इम्रान शेख, दीपक जावीर, पप्पू भिसे, जोतिराम लोहार इत्यादींचा समावेश होता…







