- दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासना नंतर शेतकऱ्यांनी कार्यालयाचे उघडले कुलुप
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालूक्यातील राजेराय टाकळीसह त्या आसपास गावांच्या परीसरातील विद्युत पुरवठा तुटवडा होत असल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी खुलताबाद येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले होते जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुलुप उघडणार नाही असा ठाम निर्णय घेतलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येइल असे आश्वासन मिळाल्या नंतर शेतकऱ्यांनी विद्युत कार्यालयाला ठोकलेले कुलुप उघडले असुन शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यासह उपकार्यकारी अभियंता यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
खुलताबाद तालुक्यातील राजेराय टाकळी अब्दुलपुर तांडा लामनगाव जमालवाडी तांडा अब्दुलपुर येथील शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठ्याच्या लपंडावाला त्रस्त होऊन सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास खुलताबाद येथील विद्युत वितरण कंपनी उप कार्यकारी अभियंता यांचे कार्यलय गाठले व विद्युत पुरवठयाचा लपंडाव बंद करा व विद्युत पुरवठा सुरळीत करा म्हणत कार्यालयाला कुलूप ठोकले होते.
तहसीलदार व उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजेराय टाकळीसह त्या जवळ असलेल्या गाव परीसरातील विद्युत पुरवठा गेल्या १५ ते २० दिवसापासून खंडित होत आहे सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठयामुळे व शेतातील विद्युत पंप बंद असल्याने त्यात आठ तास लोडशेडिंग होत असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी लागवड केलेली अद्रक गहू हरभरा कांदा टोमॅटो मका भाजीपाला इत्यादी पिके करपून गेली आहे पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे विद्युत पुरवठयाच्या लपंडावाला शेतकरी वैतागले असुन शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे.
या संदर्भात सुलतानपूर येथील कनिष्ठ अभियंता सुजाता जाधव यांना २ डिसेंबर रोजी निवेदन दिले तरीही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही डोळ्या समोर आमचे हतात येण्या सारखे पिके पाण्याअभावी करपत असून पिके जगण्यासाठी विज पुरवठा सुरळीत करावा विज पुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास राजेराय टाकळी लामनगाव व परीसरातील गावाचे शेतकरी कार्यालया समोर आंदोलन करतील दरम्यान शेतकऱ्यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास सर्वस्वी जवाबदारी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी खुलताबाद येथील विद्युत कार्यालयाला कुलूप ठोकताना शेतकरी दत्तू मालोदे कृष्णा भागडे आशोक मालोदे नजीर पटेल सांडु जाधव किशोर जाधव अल्ताफ पटेल चंद्रशेखर जामदार शेख फारूक काशिनाथ भागडे कारभारी कोल्हे कारभारी मालोदे हरीचंद्र मालोदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.







