खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – स्वच्छता निरीक्षक न.प संवर्ग कर्मचाऱ्यांनाप्रमाणे राज्य सेवा संवर्गात समाविष्ट करण्यात आले असुन राज्यातील पात्र व अपात्र 102 कर्मचाऱ्यांची यादी 4 डिसेंबर 2020 रोजी राज्य शासनाने जाहिर केली.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद,नगरपंचायत कर्मचारी संघटनेने ही मागणी लावून धरली होती.त्याला नगरविकास विभागाने 8 ऑगस्ट 2019 रोजी मान्यता दिली होती.मात्र तसे आदेश निघाले नव्होते.महाराष्ट्र राज्यात नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीत स्वच्छता निरीक्षकांची एकूण सहाशे पदे निर्माण केली आहेत.न.प आस्थापनेवर असलेल्या या पदाला राज्य सेवेत समावेशासाठी सध्या कार्यरत सर्व प्रवर्गातील स्वच्छता निरीक्षकांकडुन विकल्प मागविले होते.
पहिल्या टप्प्यात 102 कर्मचाऱ्यांनी विकल्प सादर केले होते.यापैकी 78 पात्र ठरले आहेत.तर 32 कर्मचाऱ्यांना किरकोळ कारणावरून अपात्र ठरविले.2 सेवानिर्वृत झाले आहेत.मात्र पात्र कर्मचारी राज्य सेवा बहाल झाल्यानंतर शासनाचे कर्मचारी म्हणून गणले जातील. तसेच जे कर्मचारी परिषदेत इतर पदांवर कार्यरत आहेत व स्वच्छता निरीक्षकाची पदवी धारण केली आहे त्यांचा समावेश करण्यासाठी देखील संघटनेकडुन प्रयत्न सुरुच राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्षांनी दिली. याप्रसंगी खुलताबाद नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शेहजाद बेग व उपाध्यक्ष अंकुश भराड यांनी न.प संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डी.पी शिंदे तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.







